google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना... प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू

Breaking News

धक्कादायक घटना... प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू

धक्कादायक घटना... प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू


 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचा भीषण रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. एका लाॅरीने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चित्रिकरण आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी तिने एका ॲपवरून बाईक बुक केली होती. ती चालकाच्या मागे बसली होती. अचानक त्यांच्या बाईकसमोर एक सायकलस्वार आला. 

त्याला वाचवण्यासाठी बाईक चालवणाऱ्याने अचानक ब्रेक मारला. यावेळी सुचंद्राचा तोल गेला आणि ती बाईकवरून थेट खाली रस्त्यावर पडली. त्याचवेळी अचानक मागून येणाऱ्या लॉरीने सुचंद्राला चिरडले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 

या भीषण अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली. बाराजनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या घोषपाराजवळ हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा सुचंद्राने हेल्मेटही घातले होते. मात्र अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

आसपासच्या लोकांनी तिला तात्काल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. तिच्या अकाली जाण्याने बंगालच्या टीव्ही उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. अनेक मान्यवरांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

सुचंद्रा दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गौरी’मध्ये झळकली. या मालिकेतून सुचंद्रा दासगुप्ताला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याचबरोबर तिने अनेक फेमस बंगाली टेलिव्हीजन शोमध्ये काम केले होते.

Post a Comment

0 Comments