ब्रेकिंग न्यूज... सांगोल्यातील सराफ
व्यावसायिकांवर कर्नाटक पोलिसांची 'दादागिरी'
दीपक साळुंखे-पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नरमले कर्नाटक पोलीस
सांगोला / तालुका प्रतिनिधी कर्नाटकात चोरीला गेलेले सोने सांगोला येथील सराफ दुकानात विक्री केले असल्याचा संशय घेऊन
बेंगलोर शहरातील व्ही. व्ही. पुरम पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सांगोला शहरातील चार सराफ व्यवसायिकांना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही कर्नाटक पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली सांगोला येथील सराफ व्यवसायिकांना ताब्यात घेऊन त्यांची अडवणूक व आर्थिक वाटाघाटी केल्याने
राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडल्याने कर्नाटक पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत सराफ व्यवसायिकांना सोडून दिले.
ही घटना रविवार दि. १४ मे रोजी रात्री उशीरा सांगोला शहर आणि पोलीस स्टेशनमधेघडली. कर्नाटक मध्ये झालेल्या चोरीत चोरलेले सोने या चोरांनी सांगोला येथील सराफ दुकानात विक्री केली असल्याचे कर्नाटक पोलिसांचे मत होते, त्यानुसार ते तपास कामासाठी सांगोला येथे आले होते.
यावेळी सांगोला शहरातील सचिन ज्वेलर्स, फाल्गुनी ज्वेलर्स, पिताश्रीज्वेलर्स आणि आनंद फाटे यांचे ज्वेलर्स येथे जाऊन त्यांच्या दुकानातील मालक आणि कर्मचाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले.
आणि त्यांना सांगोला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. महाराष्ट्रात तपास कामासाठी येत असताना तुम्ही तुमच्या कागदोपत्रीचौकशीच्या नावाखाली आरोपीसारखी वागणूक
सांगोला शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात सराफ व्यवसाय चालतो याची कर्नाटक पोलिसांनाही जाणीव आहे, त्यामुळे अनेकवेळा चौकशीच्या नावाखाली कर्नाटकातील पोलीस
सांगोला येथील सराफांना आपल्या राज्यात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात, तिथे त्यांना कारवाईची भीती दाखवून आरोपी सारखी वागणूक देतात. त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल करतात.
- अक्षय महामुनी, अध्यक्ष सराफ असोसिएशन, सांगोला,
बाबीची पूर्तता केली आहे का...? जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा सांगोला येथील पोलीस स्टेशनची पूर्वपरवानगी r1drघेतली आहे का..? अशी विचारणा करत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
यानंतर पूर्वी आपल्याच तोऱ्यात असणाऱ्या कर्नाटक पोलिसांनी आपल्याकडे कोणताही कागदोपत्री सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने आणि सांगोला येथील सराफांना बेकायदेशररित्या ताब्यात घेतल्याने नरमाईची भूमिका घेत सोडून देण्याचे मान्य केले.
0 Comments