google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना ... मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका ! पंढरपूर तालुका हादरला !

Breaking News

खळबळजनक घटना ... मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका ! पंढरपूर तालुका हादरला !

खळबळजनक घटना ... मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका ! पंढरपूर तालुका हादरला !


मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका' असा संदेश सोशल मीडियावर देत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दत्त कृपा पेट्रोल पंपाचे मालक बेपत्ता झाल्याने पंढरपूर तालुका हादरला आहे. काल रात्रीपासून भोसे परिसरात तर प्रचंड खळबळ उडाली आहे.

भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब  राजाराम माळी यांनी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता सोशल मोडियावर आत्महत्या करीत ८ असल्याची सुसाईड नोट लिहून पाठवल्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. रात्रीत आणखी काय काय घडले आहे

 याची नेमकी माहिती मिळाली नाही पण सोशल  मीडियावर ही सुसाईड नोट काल रात्रीपासून वेगाने फिरत आहे. आपण कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याचे या नोट मध्ये लिहिलेले असून यामुळे सगळेच हादरून गेले आहेत.  पंढरपूर  तालुक्‍यातील भासे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे.

 या पेट्रोल पंपावर मॅनेजर  म्हणून पंढरपूर येथील एक व्यक्ती  आणि  बाळासाहेब माळी यांचे एक नातेवाईक  हे  पंपावरील  कामकाज पाहत होते. या दोघांनी आर्थिक  व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाईड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवार  (दि. १५) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. 

माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब माळी यांनी आत्महत्येची नोट सोशल मीडियावर टाकली आणि आपल्या कुटुंबासह ते अज्ञात स्थळी गेले आहेत. आपल्या झालेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमदाटीला कंटाळल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे या नोटमध्ये नमूद केल्याने हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बाळासाहेब माळी यांच्यासारख्या उमद्या व्यक्तिमत्त्वाने अशो नोट लिहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास झाल्यावर यातील सगळे रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे पण तो पर्यंत तरी ही खळबळ शांत होण्याची शक्यता नाही.

बाळासाहेब माळी यांनी व्हॉटस्‌अँप ग्रुपवर हा धक्कादायक संदेश टाकलेला असून तो रात्रीपासून परस्परांना पाठवला जात आहे. पंढरपूर तालुक्यासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक असून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरली आहे. (Balasaheb Mali went missing after making the suicide note viral) हा संदेश वाचून अनेकजणांना हादरा बसला आहे. काल रात्रीपासून भोसे परिसरात या एकाच घटनेची चर्चा सुरु झाली आहे. 

बाळासाहेब माळी यांचा हा संदेश : (संबंधितांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला आहे परंतु आम्ही तो वगळला आहे )

"मी आत्महत्या करीत आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. लांब आहे. शेवटचा मेसेज, माझा विश्‍वासघात केला आहे. मॅनेजर xxxx (नोट मध्ये नावाचा उल्लेख आहे )  पंढरपूर व माझा पुतण्या या दोघांनी मला व माझ्या पत्नीला विश्‍वासात घेऊन, माझे दत्तकृपा पेट्रोलियम भोसे, हे दाघे विश्‍वासू म्हणून बघत होती. 

माझा व माझ्या पत्नीचा स्वभावाचा फायदा घेऊन यांनी रुपये एवढी फसवणूक केली आहे. मी जमीन विकून व सांगोला अर्बन बँकेतून  कर्ज घेऊन पंप चालू केला. हे दोघे  विचारले की, काही अडचण नाही, आम्ही प्रामाणिकपणे करीत आहे, असे सांगायचे. एका महिला व्यवसायिकाची फसवणूक झाली आहे. 

माझो पत्नी  सौ. सुरेखा माळी, भोसे अचानक भांडवल पडले, त्यामुळे पंप बंद पडल्यानंतर एक दिवशी माझ्या लक्षात आली व मी सीए जोशी, पुणे यांच्याकडून हिशोब बघितला असता मला धक्का बसला. तरी यांनी आम्ही सात (७) सात लाख घेतली असताना बोगस लिहून तरीही यांच्याकडे. ९९ लाखाला फसवले आहे 

व त्यामुळे बँकेला पंधरा लाख व्याज गेले आहे. असेच सर्व मिळून एक कोटी एकवीस लाख रुपये फसवणूक झाली आहे (यात काही रक्‍कम वाढू शकते किंवा थोडी कमी होऊ शकते) वरून मला XXXX म्हणतो की, मी व माझ्या ग्रुपने मिळून तीन खून केले आहेत, पाच हप मर्डर व कित्येक लोकांना मारले आहे. माझ्याविरुद्ध कोणीही तक्रार देऊ शकत नाही. 

त्यामुळे मला व माझ्या परिवाराला व पंपावरती कर्मचाऱ्यांच्या जीवितस धोका आहे. XXXने आत्तापर्यंत ज्या पंपावर काम केले आहे त्यांना फसवले आहे. गुप्तपणे माहिती घ्यावी. समोर येण्यास कोणी तयार नाही. 

दारू पिऊन रात्री अचानक पंपावरती येतो. यातून मी सावरत नाही, म्हणून माझ्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय नाही. तरी आपण व इतर संबधिताची मदत घेऊन माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा ही परमेश्‍वर आपल्या परिवाराची कल्याण करेल विनंती". 

Post a Comment

0 Comments