google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! मंगळवेढ्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू; १२ जणांना घेतला होता चावा

Breaking News

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू; १२ जणांना घेतला होता चावा

 धक्कादायक! मंगळवेढ्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू; १२ जणांना घेतला होता चावा


पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या काझी गल्ल्ली परिसरातील मोहम्मद हिरालाल बेदरे यांचा अखेर दोन महिन्यांनी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.

त्यांचे पश्चात्य दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. अडीच महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने एका शनिवार पेठ , जगदाळे गल्ली , माने गल्ली , बोराळे नाका ,सराफ गल्ली येथील सुमारे १२ जणांना चावा घेतला आहे . चावा घेतलेल्यांना मंगळवेढा व सोलापूर येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यापैकी मोहम्मद हिरालाल बेदरे यांनाही हे कुत्रे चावल्यामुळे सोलापूर येथील रूग्णालयात उपचार होते. उपचारादरम्यानच सुरू रविवार दिनांक १४ मे रोजी त्यांचे निधन झाले होते. आज १० देवसानंतर त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचाही दिनांक २४ रोजी दुपारी १ च्या सुमारास मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मंगळवेढा शहरातील मोकाट व बेवारस कुत्र्याला लगाम घालण्यात संबंधित शासकीय अधिकारी अपयशी ठरला असून तो चावलेल्या कुत्र्याच्या हल्यातील हा दुसरा बळी असुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

Post a Comment

0 Comments