google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळा येथे बाल संस्कार शिबीरास उत्साहात सुरुवात..रुद्रपशुवती कोळेकर महास्वामी यांच्या मठात लहान मुलांची शिबिरात उपस्थिती.

Breaking News

सांगोला कोळा येथे बाल संस्कार शिबीरास उत्साहात सुरुवात..रुद्रपशुवती कोळेकर महास्वामी यांच्या मठात लहान मुलांची शिबिरात उपस्थिती.

सांगोला कोळा येथे बाल संस्कार शिबीरास उत्साहात सुरुवात..



रुद्रपशुवती कोळेकर महास्वामी यांच्या मठात लहान मुलांची शिबिरात उपस्थिती. 

सांगोला वार्ताहर(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सांगोला तालुक्यातील कोळा येथे श्री. श्री. श्री गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी मठामध्ये बालसंस्कार शिबिरात नाझरा,कोळा, जवळा, चोपडी अकोला टेंभुर्णी या गावातील जवळपास १७० बाल गोपाळ व लहान मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत भरण्यात आलेल्या बाल संस्कार शिबिरात सहभाग घेतला

 असून मोठ्या उत्साहात शिबिराची सुरुवात झाली आहे जवळपास पंधरा दिवस शिबिर चालणार असल्याने या बालसंस्कार शिबिरामुळे कोळा नगरीत आनंदाचे वातावरण आहे.

या बालसंस्कार शिबिर श्री. श्री. श्री. १०८ गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी, शिवाचार्य महाराज मासोलीकर, हिंगणगावकर महाराज यांचे आशिर्वादाने तसेच हनुमंत कोरे 

महाराज तांदुळवडी ता. परांडा यांचे मार्गदर्शनाने, सर्व ग्रामस्थ कोळे यांच्या सहकार्यने तसेच श्री. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज बहुउद्देशिय संस्था कोळे यांच्या वतीने भव्य बाल संस्कार शिबीराचे आयोजन केले

 असून वय वर्ष सहा ते १६ वयोगटातील लहान मुलांनी उपस्थिती लावली होती शिबिर घेण्याचा उद्देश म्हणजे बालमनावर अध्यात्मिक सुसंस्कार घडवून

 त्यांच्यातील धार्मिकता वाढावी व पुढील पीढ़ी सुसंस्कारीत व्हावी या शुद्ध हेतूने बाल संस्कार लहान मुलांना व्हावे शिबीरामध्ये शिकविले जाणारे

 विषय परमरहस्य, हनुमान चालीसा, शिवस्तृती, शिवपाठ, पावली, हार्मोनियम, पकवाज, टाळ, गायन, योगासने, निवडक श्लोक सुरपेटी व तबलावादक इ. सर्व शिबिरामध्ये शिकवले जात आहे. 

बाहेरगाहून आलेल्या बालगोपाळांना लहान मुलांना भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली आहे बाल संस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज बहुउद्देशिय संस्था, कोळे सहाय्यक सर्व ग्रामस्य कोळे घेत आहे.

Post a Comment

0 Comments