google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना.. वहिनीच्या बहिणीला फोन का करतो म्हणून...डोक्यात दगड मारून २३ वर्षीय तरुणाचा खून... सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

धक्कादायक घटना.. वहिनीच्या बहिणीला फोन का करतो म्हणून...डोक्यात दगड मारून २३ वर्षीय तरुणाचा खून... सोलापूर जिल्ह्यातील घटना

धक्कादायक घटना.. वहिनीच्या बहिणीला फोन का करतो म्हणून...


डोक्यात दगड मारून २३ वर्षीय तरुणाचा खून... सोलापूर जिल्ह्यातील घटना 

सध्या समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ गोष्टीवरून टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडला आहे. वहिनीच्या बहिणीला चोरून फोन का करतो, 

या कारणावरून २३ वर्षीय तरुणाच्या डोक्यात त्याच्यासोबतच काम करणाऱ्या हॉटेल कामगारानेच दगड घालून खुन केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पोखरापूर गावच्या शिवारात काल सकाळी घडली. धवेंद्र उर्फ संजु राजु यादव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर पोखरापूर गावच्या हद्दीत हॉटेल आकाश येथे मृत संजू {रा.पतौडी, ता. व जि. सटना राज्य मध्य प्रदेश} व संदीप रामनरेश यादव ( रा. चचाई, ता. सेमरिया, जि. रिवा, राज्य मध्यप्रदेश) असे दोघे इतर दोन कामगारांसह काम करत होते. 

वेटर संजू यादव, वस्ताद बाल मुकुंद चौधरी, संदीप यादव व सत्येंन्द्र वर्मा हे हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या रूममध्ये राहत होते. 

परवा रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास संजू हा संदीपच्या वहिनीच्या बहिणीला चोरून फोन करतो, या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.

 त्यानंतर खोलीतील इतर सहकाऱ्यांनी संजु व संदीपच्या झालेले भांडण सोडवून सर्वजण झोपी गेले होते. सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हॉटेलचा वस्ताद बाल मुकुंद चौधरी याला जाग आली. 

त्यावेळी त्याने बघितले की, संदीप हा मोठा दगड घेऊन संजू याच्या अंगावर उचलून मारत आहे. त्यावेळी त्यांनी लगेच त्याला धक्का दिला व तो दगड खाली पडला. त्याच वेळी खोलीतील सत्येंन्द्र वर्मा हा पण जागा झाला. 

संदीपने सत्येंन्द्र वर्मा याला सोबत घेऊन तेथून पळ काढला. त्यावेळी या घटनेची माहिती बालमुकुंद चौधरी यांनी हॉटेल मालक धनाजी गायकवाड यांना दिली. 

गायकवाड यांनी मोहोळ पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात संजू याच्या डोक्यात दगड मारून जीवे ठार मारल्या प्रकरणी संदीप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments