संतापजनक... सोलापूर! पित्यानेच केला पोटच्या मुलीचा अडीच लाखाला सौदा
सोलापूर:- 'एका बाजूला मूल सांभाळण्याची विवंचना अन् दुसऱ्या बाजूला मुलगा हवा चा आग्रह' असल्याच्या वास्तव घटनेने सोलापुरात खळबळ माजलीय.
या घटनेत १८ दिवसाचं बाळ बेकायदेशीर दस्त करून विकण्यात आल्याचा संतापजनक आणि तितकाच चिंताजनक प्रकार उजेडात आला होता.
या प्रकरणात सदर बझार पोलिसांनी 'त्या' अभागी बाळाच्या आई-वडील,आजीसह १० आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच अजून एक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे.
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला मागे सारणारा ह्या वास्तव प्रकार असून,एका अल्पवयीन पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीला बापाने चक्क विविध जिल्ह्यातील कला केंद्रात पाठवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, त्या पित्याने मुलीला शहरातील एका कलाकेंद्रात अडीच लाखाला चार महिन्यापूर्वी दिले होते.
दरम्यान, मुलीने या घटनेची माहिती आईला सोशल मीडियावरून संपर्क साधल्यावर ही घटना उघडकीस आली. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील एक दाम्पत्य कौटुंबिक वाद झाल्याने
दोघे विभक्त झाले. यावेळी मुलगी वडिलांकडे राहत होती.पित्याने त्या मुलीला तीन ते चार महिन्यापूर्वी एका कलाकेंद्रात अडीच लाख रुपये उचल घेत सोपविले.
ही घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. दरम्यान, त्या पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाली. या घटनेची माहिती कळताच जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे वसंत पवार, विजय जाधव, संजीवनी व्हट्टे यांनी त्या पीडितेची मदत केली.


0 Comments