आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल : पैसे माघारी मागणाऱ्यांना करायचा बॅकमेल
आटपाडी : आटपाडी, सांगोला, माण, विटा, करमाळा, सांगोला तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली इस्त्राईल
येथे परदेशात घेवून जातो असे सांगून तब्बल ५१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्या विरुद्ध आटपाडी पोलिसात फसवणुकीच्या नावाखाली गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी नानासो दादा गडदे वय ३७ रा. गौडवाडी तालुका सांगोला, जि. सोलापूर यांची त्यांचे मित्र नाना यशवंत माळी, रमेश चोपडे यांच्या मार्फत
डाळिंब शेतीच्या माध्यमातुन आरोपी महेश भाऊसाहेब कडूस-पाटील वय ३७ वर्ष रा. गणेश-२ बिल्डींग प्लॅट ०३ विश्वेश्वर मंदिरासमोर, बिजलीनगर, चिंचवड-पुणे याची ओळख झाली. यातून आरोपीने स्वत:ची अॅग्रीकल्चर ग्रॅज्युइट कंपनी असून शेतकऱ्यांना शेतीच्या विविध प्रयोगासाठी कंपनी शेतकऱ्यांच्या इस्त्राईल दौऱ्यामध्ये घेवून जात असल्याचे सांगितले.
यातून त्याने फिर्यादी यांच्यासह त्यांच्या चार मित्रासहित एकूण ३२ लोकांचे प्रत्येकी एक लाख साठ हजार रुपये भरून घेतले. आरोपीने फिर्यादी यांच्यासह त्यांच्या मित्रांना मुंबई येथे इस्त्राईलला जाण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले.
परंतु त्या ठिकाणी त्यांना व्हिजा उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगत माघारी पाठविले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला वारंवार दिनांक २८/०३/२०२२ पासून दिनांक ११/०५/२०२३ पर्यंत इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी कधी जायचे आहे
असा तगादा लावला होता. परंतु आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना फसवत होता. याबाबत फिर्यादी यांची फसवणूक झाल्याने त्यांनी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पैसे माघारी मागितल्यावर करायचा बॅल्कमेल आरोपी महेश भाऊसाहेब कडूस-पाटील हा वेगवेगळ्या कारणे सांगून शेतकऱ्यांना फसवत होता.
शेतकरी ज्यावेळी पैसे माघारी मागत त्यावेळी तो शेतकऱ्यांना धमकावत त्यांनाच बॅकमेल करायचा. तसेच ज्या-ज्या शेतकऱ्यांची कृषी दुकाने आहेत त्यांच्या विरुद्ध तो तक्रार करायचा
0 Comments