google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली

Breaking News

कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली

कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून

दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली

दक्षिणेतील राज्यात फार यश न मिळालेल्या भाजपला एकमेव राज्यातील सत्ताही गमवावी लागली आहे. कर्नाटकात भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागल आहे. कर्नाटकने सत्तेसाठी काँग्रेसला जनादेश दिला असून, स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला असून, 127 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 3 जागा जिंकल्या असून, 62 जागांवर आघाडीवर आहे. 

काँग्रेसला एकूण 133 जागा मिळताना दिसत असून, भाजपला 65 जागा मिळू शकतात. जेडीएस 22 जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यश दृष्टिपथात आल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या विजयाचं श्रेय सर्व कार्यकर्त्यांना देताना खर्गे यांनी त्यांचं अभिनंदनही केलं.

 कर्नाटक निवडणुकीत झपाटून काम केलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे एकत्रित यश आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments