मोठी बातमी..गाळे धारकांकडून लिलाव,शर्ती अटींचा भंग ; पोटभाडेकरू
,बेकायदा तोडफोड, अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर ; न पा प्रशासन बघ्यांच्या भुमिकेत
सांगोला प्रतिनिधी ; सांगोला नगरपरिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व आरक्षण मध्ये अनेक गाळेधारकांनी लिलाव मधील शर्ती व अटींचा भंग करून आपल्या गाळ्यात पोटभाडेकरू ठेवले आहेत.
अनेक गाळेधारकांनी न पा प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाडकाम केले आहे. अनेक गाळेधारकांनी वहातुकीस अडथळा निर्माण करून रोडवर व पादचारी मार्गावर अतिक्रमणे केले आहेत.अनेक गाळेधारकांनी मोठमोठे डिजिटल बोर्ड लावले आहेत.
तरीही या सर्व प्रकाराकडे सांगोला नगरपरिषद प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहे. न पा प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या, रोडवर ठेला लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याची अतिक्रमणे हटवण्याचा चंग बांधला आहे.
मग या गाळेधारकांनी केलेले अतिक्रमणे ही न पा प्रशासन काढणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सांगोला शहरातील शिवाजी चौक, नेहरू चौक,जुनी भाजी मंडई, जयभवानी चौक,नवीन भाजी मंडई तहसील कार्यालयासमोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या
व्यापारी गाळ्यांच्या समोर गाळेधारकांनी वहातुकीस अडथळा निर्माण करून, पादचारी मार्गावर न पा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत.
या सर्व गाळेधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली अतिक्रमणे न पा प्रशासनाने जाणीव पुर्वक काढली नाहीत ,उलट या गाळेधारकांना न पा प्रशासनाने पाठीशी घालण्याचे काम केले आहे.
सांगोला नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी साहेब यांनी शहरातील वहातुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवणार असल्याचा निर्धार केला आहे.मग गाळेधारकांनी केलेली अतिक्रमणे मुख्याधिकारी साहेब काढणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


0 Comments