एनसीसीमुळे आदर्श देशभक्त निर्माण करणे शक्य~कर्नल राजेश गजराज कळा येथे
दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात एनसीसी कॅम्प संपन्न..
सांगोला वार्ताहार(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील
बार्शी कुर्डूवाडी सोलापूर अक्कलकोट पंढरपूर करमाळा मंगळवेढा माळशिरस या भागातील एनसीसी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पचे आयोजन असून
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आदर्श देशभक्त निर्माण करणे एनसीसीमुळे शक्य असल्याचे कर्नल राजेश गजराज यांनी विचार व्यक्त केले..
कोळे ता सांगोला येथे डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्था संचलित दीपक आबा साळुंखे महाविद्यालयात
आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक
सर्वसाधारण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कमांडींग ऑफिसर म्हणून राजेश गजराज बोलत होते. यावेळी कर्नल विक्रम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहाय्यक अधिकारी कर्नल विक्रम जाधव यांनी देशातील प्रत्येक पिढीने शिस्त पाळली पाहिजे,
असे सांगून एनसीसीद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते त्याचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन केले.शिबिरासाठी कमांडींग ऑफिसर कर्नल राजेश गजराज, सहाय्यक अधिकारी कर्नल विक्रम जाधव,
सुभेदार मेजर अरुणकुमार ठाकूर, सुभेदार प्रेमानंद एनसीसी अधिकारी लेप्टनंट सुल्ताना पठाण,
कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने सुभेदार ठाकूर, सुभेदार रामचंद्र, हवालदार नानासाहेब साठे, हवालदार दीपक पाटील यांच्यासह १३ निर्देशक प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक माने,
सचिव अमोल माने, संचालक शरद माने यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी संपूर्ण सहकार्य करत आहेत.
तरुणांना चांगली संधी उपलब्ध कोळ्यासारख्या ग्रामीण भागात जिल्हा स्तरावरील एनसीसी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामुळे ग्रामीण भागातील सैन्य दलात जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सैनिकी जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे,
दहा दिवसांच्या या शिबिरात एनसीसीमधील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शस्त्रांची माहिती, युद्धकला, नेमबाजी, परेड आदी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात गुणवता आहे मात्र माहिती कमी मिळत असल्याने तरुणांना सैन्य दलात जाणे व अधिकाराच्या जागा मिळविता येत नाहीत.
या शिबिराच्या माध्यमातून प्रथमच ग्रामीण भागातील तरुणांना चांगली संधी उपलब्ध झाल्याचे कर्नल विक्रम जाधव यांनी सांगितले.
चौकट...
कोळ्या सारख्या ग्रामीण भागात महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्यावतीने डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्थेच्या प्रांगणात
एनसीसी जिल्हास्तरीय कॅम्पचे आयोजन केले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट बाब आहे सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.
~ दिपकराव माने
संस्थापक डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्था कोळा
0 Comments