धक्कादायक घटना.. सोलापूर! मोठ्या हौसेने अर्चना माहेरी आली मात्र...
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील एका महिलेची बिल्डरने फसवणूक केली.
या घटनेचा धक्का बसून संबंधित महिलेने टोकाचे पाऊल उचलले.
जागा नावावर कर म्हणत महिलेचा छळ केल्याने महिलेने माहेरी आईकडे सोलापूरात येऊन तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अर्चना ज्ञानेश्वर कोटा (वय-३८,रा.हैद्राबाद,तेलंगणा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
यावेळी त्यांनी सहा ते सात व्हिडिओ तयार करून त्यात आपल्या मृत्यूस तेलंगणातील बिल्डर कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
याप्रकरणी अर्चना यांची बहीण सुरेखा गोपीचंद सरवदे (वय-३३,रा.निलम नगर,आकाशवाणी केंद्र) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून नागराज यादव (रा.हैद्राबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सुरेखा यांची बहीण मृत अर्चना या हैद्राबादमध्ये राहण्यास होत्या.
त्यांना त्यांच्या सासर्याने चार मिनार परिसरातील मोक्याच्या ठिकाणातील जागा बक्षिस स्वरूपात दिली होती.
यातील १ हजार स्केअर फूट जागा त्यांनी आरोपी यादव यांना विकली होती. दुसऱ्या व्यवहारात आरोपीने व्यवहारातील रक्कम पूर्ण न देता न वटणारे चेक दिले.
त्यानंतर अर्चना यांच्या पतीचे निधन झाले. दरम्यान, अर्चना या आरोपीच्या जागेमध्ये भाड्याने राहण्यास
गेल्यानंतर आरोपीने त्यांना नळाने पिण्याचे पाणी न देता त्यांना त्रास दिले. ही बाब त्यांनी फिर्यादींना फोनमधून सांगितली.
दरम्यान, १ मे रोजी त्यांनी आईकडे येऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
यावेळी त्यांनी तेलगु भाषेत सहा ते सात व्हिडिओ तयार करत आपल्या मृत्यूस संबंधित बिल्डर असल्याचे सांगितले.
याप्रकरणी आरोपी नागनाथ यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि चौधरी करत आहेत.
0 Comments