धक्कादायक प्रकार... भावाने सख्ख्या बहिणीला राहत्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये मोठ्या पेव्हर ब्लॉकने ठेचून तिची निर्घृण हत्या
मंगळवारी संध्याकाळी शिर्डीतील कालिकाना
गर जवळ असलेल्या मयुरेश्वर कॉलनीत उघडकीस आला आहे. ह्या घटनेनंतर शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे वय १७ वर्ष असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ श्रूत नवनाथ कुल्थे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २ मे रोजी सायकाळी आरोपीने त्यांची नात (मयत) वय १७ वर्ष रा. सौंदडी बाबा मंदिराजवळ शिर्डी ता.राहाता हिच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करून खून केला.
आरोपी भावाने असं काही उत्तर दिलं की पोलीस अधिकारी हादरूनच गेले. आपण राहत्या घरीच लहाण बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला संपवल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं.
यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे


0 Comments