यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा सन ९२|९३चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न
सांगली वार्ताहार:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क संकेत पवार)
यशवंतराव चव्हान विद्यालयाचा सन ९२ / ९३ चा विद्यार्थी स्नेसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे स्वागत सरिता कुंभार यांनी केले,
दीप प्रज्वलन राजश्री पाटील ,सरिता कुंभार , यल्लाक्का कोळी श्री.महावीर पाटील श्री.दिलीप लांडे यांनी केले. ९२| ९३ च्या बॅचमधील दोन मित्र
काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ व्यासपीठाला स्वर्गीय सुधा पाटील यांचे नाव देण्यात आले तसेच प्रवेशद्वाराला श्री किशोर कांबळे प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते.
विद्यालयाचे शिपाई श्री मोहन सपकाळ यांचा पोशाख व शाल देऊन यथोचित सन्मान करणेत आला
हा सत्कार रूपाली पाटील व राजमती मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.मोहन सपकाळ यांनी आपल्या मनोगत त्यांचा सत्कार केल्याबद्दल आनंदाने भारावून गेल्याचे सांगितले .
या स्नेह मेळाव्यात प्रत्येकाने आपापले मनोगत व शाळेतील किस्से सांगितले त्यामुळे शाळेतील जुन्या आठवणींमध्ये प्रत्येकाचे मन रमले.
वेगवेगळ्या प्रकारचे फनी गेम्स आयोजित केल्यामुळे एकंदरीत वातावरण उत्साहाचे व खेळीमेळीचे झाले होते. राजश्री पाटील, सरिता कुंभार, यल्लाक्का कोळी यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
डॉ. श्रीआनंद सपकाळ, डॉ. श्री.गजानन सपकाळ ,पोलीस पाटील श्री.सतीश पाटील, सोसायटी संचालक
श्री .सुनील पाटील अशा वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला डॉ श्री आनंद सपकाळ व डॉ गजानन सपकाळ यांनी आरोग्य व व्यायाम याविषयीची महत्त्व सांगितले.
आरती जोशी यांनी ताण-तणाव रहितआयुष्य आनंदाने कसे जगायचे हे सांगितले. सर्व कार्यक्रम आनंदाने आणि उत्साहात पार पडला आरती जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.


0 Comments