google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. वाळूचा मुबलक साठा...महाराष्ट्रातील पहिल्या‎ डेपोतून एक कणही वाळू विक्री नाही...

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. वाळूचा मुबलक साठा...महाराष्ट्रातील पहिल्या‎ डेपोतून एक कणही वाळू विक्री नाही...

ब्रेकिंग न्यूज.. वाळूचा मुबलक साठा...महाराष्ट्रातील

पहिल्या‎ डेपोतून एक कणही वाळू विक्री नाही...

राज्य सरकारने १ मेपासून ६०० रुपये ब्रासने वाळू विक्री‎ सुरू केली. मात्र वाळूचा मुबलक साठा उपलब्ध होत ‎ ‎

 नसल्यामुळे १ मे रोजी सुरू झालेली वाळू विक्री थांबली‎ आहे. मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून महसूल ‎ ‎ प्रशासनाने आता विविध नदीपात्रांमधून वाळू एकत्र ‎ आणण्याचे काम सुरू केले आहे.

सध्या महाराष्ट्रातील ‎ नायगाव येथील पहिल्या वाळू डेपोत १ हजार ब्रास वाळू‎ जमा झाली आहे.

 पुढच्या आठवड्यात ग्राहकांना ही वाळू ‎ ‎ सहाशे रुपये ब्रास दराने दिली जाणार आहे. गेल्या चार ‎ ‎ दिवसांत राज्यातील पहिल्या वाळू डेपोतून एक कणही ‎ ‎ वाळूची विक्री झालेली नाही.‎

राज्य सरकारने नव्या धोरणानुसार ग्राहकांना ६०० रुपये‎ ब्रासने थेट वाळू घरपोच देणे सुरू केले होते.

 नगर ‎ ‎ जिल्ह्यातील नायगाव (ता.श्रीरामपूर) येथे सुरू झालेल्या ‎ ‎ राज्यातील पहिल्या वाळू डेपोतून प्रायोगिक तत्त्वावर ही‎ वाळू विक्री सुरु झाली होती.

महसूल मंत्री राधाकृष्ण‎ विखे यांच्या हस्ते सुरू झालेल्या वाळू विक्रीला मात्र‎ आता खो बसला आहे.

 महसूल प्रशासनाला नगर ‎ ‎ जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये वाळूसाठा उपलब्ध‎ करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.‎ 

प्रशासनाकडे मुबलक प्रमाणात वाळू नसल्यामुळे १ मे‎ रोजी सुरू झालेल्या स्वस्त वाळूच्या शासनाच्या‎ निर्णयाला ब्रेक लागल याने ग्राहकांचे स्वस्त वाळूचे स्वप्न‎ देखील धुळीस मिळाले आहे.‎

Post a Comment

0 Comments