सांगोला-डोंगरगाव एसटी बस नियमीत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन - ॲड विशालदिप बाबर
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) : - सांगोला तालुक्यातील डोंगरगाव व परिसरातील शालेय विद्यार्थी विद्याथींनी व तालुक्यातील शासकीय
कार्यालयामध्ये येणान्या नागरीकांना सायंकाळी घरी जाणेसाठी उपयुक्त असणारी सांगोला आगाराची एसटी बस सायंकाळी ५ वाजणेच्या सुमारास असणारी
सांगोला डोंगरगाव हि बस नियमीत सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक नेते अँड विशालदिप बाबर यांनी सांगोला आगार प्रमुख यांना दिलेला आहे .
राज्य परिवहन महामंडळ सांगोला आगाराचे वतीने सांगोला तालुक्यातील कडलास, लोणविरे, हणमंतगाव, सोनंद, गळवेवाडी व डोंगरगाव येथील नागरीक व विद्यार्थी विद्याथींनीना सायंकाळी ५ वाजता गावी जाणेसाठी उपयुक्त असणारी व गेल्या ४० वर्षापासून
अखंड सुरू असणारी लालपरीची सेवा सांगोला आगारातील ढिसाळ नियोजनाममुळे ऐनवेळी बंद करणेचा घाट काही कर्मचारी करत असल्याचा आरोप डोंगरगाव येथील विद्यार्थी विद्याथींनीनी केलेला आहे.
वास्तविक ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी येत असतात त्यांचे शालेय कामकाज ५ वाजणेचे सुमारास संपत असते. सदर विद्यार्थी विद्यार्थीनी यांना घरी जाणेसाठी सोईची असणारी व सुरक्षित घरपोच करणारी सांगोला-
डोंगरगाव हि बस गेल्या महिन्याभरापासून अनियमीत होत आहे. त्यामुळे विद्यार्थी विद्याथींनी गैरसोय होवून पालकांची चिंता वाढत आहे. त्याचबरोबर सांगोला आगाराच्या ऐनवेळी बस बंद आहे.
असे सांगणेच्या धोरणांमुळे विद्याथींनीच्या सुरक्षितेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आपले आगारातून पुर्वीपासून सुरू असणारे सांगोला डोंगरगाव बस तातडीने नियमीत वेळेत नियमीत सोडणेत यावी अन्यथा आपणांविरूध्द् मौजे सोनंद, डोंगरगाव, गळवेवाडी, येथील नागरीक व विद्यार्थी विद्यार्थीना घेवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपले आगारा समोर करणेत येईल याची नोंद घ्यावी
अशा अशयाचे निवेदन अँड. विशालदिप बाबर यांनी काल दिनांक ता. १७/ ०५/२०२३ रोजी आगारप्रमुखांना दिलेले असून त्याबाबत त्वरीत कार्यवाही न झालेस तीव्र आंदोलन करणेचा इशाराही दिलेला आहे.
0 Comments