google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण सांगोला शहरातील बाह्यवळण महामार्गावरील घटना; अपघातग्रस्त कुटूंबानी मानले आभार...

Breaking News

आनंदा माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण सांगोला शहरातील बाह्यवळण महामार्गावरील घटना; अपघातग्रस्त कुटूंबानी मानले आभार...

 आनंदा माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण


सांगोला शहरातील बाह्यवळण महामार्गावरील घटना; अपघातग्रस्त कुटूंबानी मानले आभार...

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :-सांगोला शहरामध्ये बाह्यवळण रिंग रोड महामार्गावर वरील नवीन जयनिला हॉटेलजवळ रविवार दिनांक १४ मे रोजी रात्रीच्या सुमारास एका इर्टीगा गाडीचा अपघात झाला होता, 

अपघातानंतर अपघातग्रस्त लोक मदतीसाठी विनवणी करत होते. परंतू अपघात गंभीर असल्याकारणाने मदतीसाठी कुणीही समोर येत नव्हते, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी रुग्णवाहिकेस मदतीसाठी फोन केला होता, परंतु तात्काळ रुग्णवाहिका अजून तिथे आली नव्हती. 

यावेळी मात्र सांगोला येथील माजी नगरसेवक आनंदा माने, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, अरुण पाटील, काशीलिंग गावडे, सोमनाथ पारसे हे कोल्हापूरवरून सांगोला येथे येत असताना, त्यांना सदर अपघात दिसताच त्यांनी कोणत्याही मदतीची वाट न पाहता अपघातातील लोकांना गाडीतून बाहेर काढून त्यांना स्वतःच्या गाडीने सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.

 तेवढ्यात त्यांच्या सोबत असणारी दुसरी गाडी सुद्धा तिथे सदर ठिकाणी पोहचली होती. या अपघातामध्ये जखमी झालेले कुटुंब हे इंदापूर येथील रहिवासी असून अक्षय ढवळे, सुवर्णा ढवळे, शुभम केवरे, राजेंद्र ढवळे यांच्यासह आणखी दोघेजण असे एकूण सहाजण जखमी होते. त्यामधील एका जखमीस पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आहे.

अपघात झाल्यानंतर तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. जिथे निस्वार्थ मदतीचा हात असतो, तिथे नक्कीच माणसाच्या रूपातील साक्षात देवाचा आधार मिळतो. रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त लोकांना मदत करून 'माणुसकीचा धर्म व लोकसेवेचे कर्तव्य' पार पाडणाऱ्या लोकांमुळेच संकटात सापडलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर 'आनंद' बघणे यापेक्षा मोठे सत्कर्म दुसरे नाही.

चौकट :- 

अपघातग्रस्तांना वेळेत स्वतःच्या गाडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केल्यामुळे आनंदा माने व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो.

- अपघातग्रस्त कुटुंबीय

Post a Comment

0 Comments