google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बापरे! महिलेने एकाचवेळी दिला पाच बाळांना जन्म

Breaking News

बापरे! महिलेने एकाचवेळी दिला पाच बाळांना जन्म

 बापरे! महिलेने एकाचवेळी दिला पाच बाळांना जन्म


झारखंडची राजधानी रांची येथील रीम्स रुग्णालयात एका महिलेने तब्बल पाच मुलांना जन्म दिला आहे. महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली असून आईसह पाचही बाळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या बाबत रिम्स रुग्णालयाने ट्वीटरवर या घटनेची माहिती दिली आहे. 

याशिवाय नवजात बाळांचाही फोटो रुग्णालय प्रशासनाने शेयर केला आहे. आई आणि पाचही बाळ निरोगी असून रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती आहे. 

झारखंड येथील चतरा जिल्ह्यातील विवाहित महिलेला रांचीतील रिम्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.

 महिला एकापेक्षा जास्त बाळांना जन्म देणार असल्याचे समजताच रुग्णालय प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले होते. त्यानंतर महिलेने पाच बाळांना जन्म दिला असून नवजात बाळांचे वजन सामान्य बाळांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. 

याशिवाय डॉक्टरांनी एनआयसीयूतील निओनॅटोलॉजी विभागात नवजात बाळांना दाखल केले आहे. महिला आणि बाळांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टर्स लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

0 Comments