डिकसळ मध्ये मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ सरपंच चंद्रकांत करांडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील संघटित व असंघटित कामगारांना विविध योजनेचा लाभ घेता येतो.
मध्यान्ह भोजन योजना आता गावोगावी होण्यास सुरुवात केली आहे.दिनांक १९ मे रोजी सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे सरपंच मा.चंद्रकांत करांडे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून डिकसळ मधील गरीब-शेतमजूर यांच्यासाठी एकवेळचे जेवण मिळवण्यासाठी सरपंच यांनी प्रयत्न करून अनेक योजना पोहोचवल्या आहेत ,
त्यामध्ये ही एक योजना म्हणजे गोर-गरीब,कष्टकरी बांधवांसाठी जणू पर्वणीच ठरली आहे,प्रत्येक शेतमजूर यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत आहे.
यावेळी सरपंच चंद्रकांत करांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला , सरपंच यांना नवनाथ मंडले यांनी नारळाचे झाड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.मधुकर करताडे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी माजी उपसरपंच रणजित गंगणे, वि.का.से.सो. चे व्हाइस चेअरमन मा.विकास गंगणे, श्रीकांत गंगणे,संजय कांबळे, नवनाथ मंडले,हृतिक साळुंखे,सुरेश गौड आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.


0 Comments