google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक माहिती... सोलापूर प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

Breaking News

धक्कादायक माहिती... सोलापूर प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

 धक्कादायक माहिती... सोलापूर  प्रियकराच्या मदतीने पतीचा खून


सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने डोक्यात वार करून खून करून प्रेत कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीला व तिच्या प्रियकराला अटक केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील दादासाहेब हनुमंत पवार {वय ३६} हे दि. २६ एप्रिल पासून बेपत्ता होते.

 याबाबत दादासाहेब यांच्या नातेवाईकांनी हरवले असल्याबाबतची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान चार ते पाच दिवस दादासाहेब आढळून न आल्याने हिवरे गावातीलच नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिसांना भेटून त्या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला होता.

 त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. तपासा दरम्यान मयताची पत्नी रंजना दादासाहेब पवार व कोन्हेरी येथील दुधाचा व्यवसाय करणारा अमोल उर्फ कृष्णा अंगद पांढरे या दोघांचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

 या अनुषंगाने त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता दि. २६ एप्रिल रोजी रात्री रंजना व अमोल या दोघांनी प्रेमात अडसर ठरणारा पती दादासाहेब याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करून त्याचे प्रेत कॅनॉल मध्ये टाकल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

 दरम्यान २८ एप्रिल रोजी कुरुल हद्दीतील कॅनॉलमध्ये एक अनोळखी ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीचे प्रेत वाहत आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देऊन त्या प्रेताचे शवविच्छेदन करून ते प्रेत कामती हद्दीतच दफन केले होते. 

प्रेत दादासाहेब यांचेच असल्याची खात्री नातेवाईकांना पटली आहे. या प्रकरणी प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याचे प्रेत कॅनॉलमध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मयताची पत्नी रंजना व अमोल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments