धक्कादायक.. नाझरे येथील शेतकरी बसवेश्वर पाटील यांचा संसार उघड्यावर
नाझरे प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
नाझरे ता सांगोला येथील बसवेश्वर लक्ष्मण पाटील यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले असून पती-पत्नी थोडक्यात बचावले व त्यामुळे पाटील यांचा संसार उघड्यावर पडला आहे
बसवेश्वर पाटील व त्यांची पत्नी हे दोघेजण शेती व मजुरी करून आपली पोटजीविका भागवत असून मंगळवार नऊ मे रोजी नाझरे परिसरात वादळी वारे सुटल्याने पाटील यांच्या घरावरील पत्रे उडाले सुमारे एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे.
यावेळी तलाठी किरण बाडीवाले पोलीस पाटील लखन बनसोडे यांनी पंचनामा केला आहे तरी पाटील यांना त्वरित सरकारी मदत मिळावी असे नागरिकांत बोलले जात आहे.
0 Comments