सांगोला लक्ष्मीनगर पत्रकार जगन्नाथ साठे यांना पितृशोक
सांगोला (प्रतिनिधी) लक्ष्मीनगर ता. सांगोला येथील रहिवासी आणि पत्रकार जगन्नाथ साठे यांचे वडील तुकाराम रामचंद्र साठे यांचे बुधवारी रात्री आठच्या दरम्यान दुर्धर आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 67 होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, पत्नी, दोन मुली, आणि नातवंडे आहेत. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच स्वाती साठे यांचे ते सासरे होते. त्यांच्या निधनाने लक्ष्मीनगर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या तिसरा दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक पाच मे रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मीनगर येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.


0 Comments