धक्कादायक.. सोलापूर ! काकानेच केला पुतणीचा घात
सोलापूर- आपल्या काकाकडे आश्रयाला गेलेल्या पुतणीवर काकाने अत्याचार केल्याचा प्रकार शहरात घडला असून याप्रकरणी पीडितेने 112 नंबर डायल वरून तक्रार दिल्याने काकाला अटक करण्यात आली आहे.
पीडितेच्या वडिलांना दिसत नसल्याने आईने दुसर्या व्यक्तीशी लग्न केले. त्यामुळे पीडितेच्या पालनपोषणाची जबाबदारी आजी-आजोबांकडे आली.
एक वर्षापूर्वी काकाने आजी-आजोबांकडून मी पुतणीला सांभाळतो म्हणून तिला आपल्या कुटुंबामध्ये आणले. 28 एप्रिलच्या रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपले. पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी काकाने पीडितेचे तोंड दाबून उचलून दुसर्या खोलीत नेले
आणि तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार तिच्या वडिलांना व आजी-आजोबांना सांगितला; पण काहीच सूचेनासे झाल्याने तिने कोठे वाच्यता केली नाही.
पीडितेने धाडस दाखवून पोलिसांच्या 112 नंबर फोन करून भांडणाबद्दल व स्वत:वर काकाने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानुसार काकाविरुद्ध बाललैंगिक छळ कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


0 Comments