सांगोला मधील रुग्णसेवक नीलकंठ शिंदे सर यांची सामाजिक बांधिलकी नीलकंठ शिंदे सराचे 75 वेळा रक्तदान
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) रक्तदानातून प्रेरणा घेऊन निळकंठ वामनराव शिंदे यांनी आजवर गेल्या 20 वर्षात 75 वेळा रक्तदान करून युवकांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे
प्राण वाचण्यात मदत होते या सदउद्देशाने स्वतः संस्था उभारून गेल्या 15 वर्षांपासून रक्तदान शिबिरे भरवली आहेत तर ब्लड ऑन- कॉल सारखी सुविधा गरजू रुग्णांसाठी उभारून त्यातून मोफत रक्तदान गेली सात वर्षे रुग्णांच्या गावात जाऊन मोफत सेवा देत आहेत.
प्रथम २००४मध्ये शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये त्याने रक्तदान केले होते रक्तदानाबद्दल बरेच गैरसमज समज ते ऐकत होते परंतु त्यांना रक्तदानामुळे ताजेतवाने वाटते आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो त्यातून ही प्रेरणा मिळाली त्यातून स्वत रक्तदान करत जनजागृतीही केली.
रक्तदानाविषयी गैरसमज दूर केले २००८ पासून मित्राच्या सहकायांने संस्था स्थापन करून त्यातूनही रक्तदान शिबिरे भरवून आजवर चार हजार सातशे बाटल्या रक्त संकलन करून ते गरजूंना दिले त्यामुळे ही चळवळ शहरात सुरू करण्यात त्यांचा खारीचा वाटा असल्याचे ते म्हणतात गेल्या 20 वर्षात त्यांनी दरवर्षी तीन ते चार जशी संधी मिळेल त्याप्रमाणे रक्तदान केले.
23 मे रोजी प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात 75 वे रक्तदान करून एक नवीन आदर्श शहरात युवकांसमोर ठेवला आहे. गेल्या सात वर्षांपासून मित्रांच्या सहकार्याने ब्लड ऑन कॉल ही संकल्पना यशस्वी राबवून त्यातूनही त्यांनी रुग्णांना मोफत रक्तदान त्यांच्या रुग्णालयात जाऊन केला येणे जाण्याचा खर्चही घेतला नाही,
ब्लड ऑन कॉल साठी गेल्या 7 वर्षांत त्यांनी स्वतः सात वेळारुग्णांच्या ठिकाणी जाऊन रक्तदान केले वरचेवर रक्तदान केल्याने कधीही थकवा त्रास जाणवला नाही त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळाली पहाटे पाच वाजता ते नियमित उठतात सायकलिंग, प्राणायाम, योगा करतात या काळात त्यांना कोणताही आजार झाला नाही आज सांगोल्यात 75 वे रक्तदान करण्याचा आनंद मित्रांसोबत साजरा केला.
केवळ लोकांना हॉस्पिटल पर्यंत व उपचार देईपर्यंत नव्हे तर कित्येक प्रसंगी रक्तदान करून नीलकंठ शिंदे सर यांनी जबाबदारी पार पडली मागील अनेक वर्षांपासून एक समाजसेवक म्हणून नीलकंठ शिंदे सर काम करीत असताना बहुतांश वेळा लहान मुलांच्या सर्जरीसाठी रक्तदान केले. या प्रकारचे रक्तदानाचे महान कार्य त्यांनी केले आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


0 Comments