ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री आणि 15 आमदार अपात्र ठरणार शिंदे गटाच्या नेत्यानेच केला खुलासा!
वकील असीम सरोदे यांनी येत्या 11 किंवा 12 मे ला सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता सांगितली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालातून महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. या निकालानंतर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
कदाचित महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघण्याची देखील शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाआधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना जास्त महत्त्व आहे.
कारण निकालानंतर या घडामोडी अंतिम टप्प्यावर जाणार आहेत. असं असताना शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकालावर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षाचे कॅप्टन असं संबोधित केलं आहे.
“आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो. आता त्या 16 आमदारंमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो. पण प्लॅन प्रमाणेच घडते असं काही नाही.
आम्ही गेलो तरी इतिहास राहणार. आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने नाही, इतिहासात लिहिला जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
‘मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी…’
“सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही हसता खेळता मान्य करू. मला काही निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी. हात दाखवा गाडी थांबवा.
मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी सत्तार आमदार पक्का”, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. अब्दुल सत्तार यांना आपण आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकून येऊच अशा विश्वास आहे.
त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्याही बाजूला लागला तरी आपण पुन्हा आमदार म्हणून जिंकून येऊ, अशी अब्दुल सत्तार यांना खात्री असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसत आहे.


0 Comments