google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुणे हादरलं! महिलेसह दोन लहान मुलांचा खून! पुरावे नष्ट करण्यासाठी तिघांनाही जाळले; चुलतीसह पुतण्या, पुतणीचा खून

Breaking News

पुणे हादरलं! महिलेसह दोन लहान मुलांचा खून! पुरावे नष्ट करण्यासाठी तिघांनाही जाळले; चुलतीसह पुतण्या, पुतणीचा खून

 पुणे हादरलं! महिलेसह दोन लहान मुलांचा खून! पुरावे नष्ट करण्यासाठी तिघांनाही जाळले; चुलतीसह पुतण्या, पुतणीचा खून 

 पुण्यात महिलेसह दोन लहान मुलांचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिघांनाही जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पिसोळीतील शेतात असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

 याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव रूपसेन वाघमारे (वय ३०) याला पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे.

 आरोपी हा मूळचा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोहोटा गावचा रहिवासी आहे. तो पिसोळी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. 

त्याने स्वतःची चुलती मयत आम्रपाली वाघमारे हिचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वाद झाला असता रागाच्या भरात तिचा, तिची लहान मुलगी रोशनी (वय ६) व मुलगा आदित्य (वय ४) यांचा हाताने गळा दाबून खून केला. 

त्यानंतर त्यांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे बेडशीट व लाकडे यांच्या साह्याने जाळून टाकले.

 -------- प्रतिक्रिया -------- अनैतिक संबंधातून सदरची घटना घडली असून सुरुवातीला महिलेचा आणि मुलांचा गळा दाबून त्यांना मारण्यात आले आहे.

 त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांना जाळण्यात आले. आम्ही पुढील तपास करत आहोत. - संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन.

Post a Comment

0 Comments