जुनोनी ते बेवर रस्त्याची अवस्था इतकी वाईट डांबरीकरण करणे
गरजेचे संबधीत विभागाकडुन रोड कडे दुर्लक्ष
जिल्हाचे शेवटचे मोठे गाव म्हणुन जुनोनी गावाची ओळख आहे, या गावातुन जुनोनी ते बेवर रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे
की रोडवर खडी व मोठमोठे दगड मुरूम डांबरी पूर्णपणे उचकटून गेली आहे टोळे वर आल्याने मोटरसायकलचे अनेक अपघात झाले असून वाहधाराकांना त्रास होत आहे
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे जुनोनी बेवनूर महत्त्वाचा रस्ता आहे
जत विजापूर कर्नाटककडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असून या रोडवर काळा पवार वस्ती मोहिते वस्ती संतराम पाटील शामराव व्हनमाने घर या रोडवर दिवसभरात भरपूर वर्दळ असते धुळीचे प्रमाण वाढले आहे अनेक मोटरसायकलचे अपघात झाले असून अनेक लोक पडून जखमी झाले आहेत
बेवनुर रोड कडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे रोडची दयनीय बसेस तसेच अवस्था झाली असुन रस्ताच्या दोन्ही बाजुलाबाभळीच्या चिलारच्या झाडाचे साम्राज्य निर्माण झाले.
आहे रस्त्याचे चांगले डांबरीकरण व रोडवरील घान बाभळीचे झुडपे तसेच अरूंद रस्ता मोठा करणे गरजेचे आहे. जुनोनी गावाची लोकसंख्खा साधारणपणे सात हजाराच्या आसपास आहे. जुनोनी ते डाकामळा मोहिते वस्तीपर्यंत पर्यंत रस्त्याची 'खूप मोठी दुरावस्था झाली आहे
दगड माती मुरुम मोठमोठे दगडाचे टोळे वर आले आहेत अनेक अपघात ठिकाणी घडले असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचेकाटेरी झुडपे काढून डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
जुनोनी बेव रोडची अवस्था खूप खराब असून रोज प्रवास करून खड्डे तुन कसरत करत मोटरसायकल चालवावी लागत आहे अनेकांना कमरेचा त्रास सुरू झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मालाचे दुकाने व मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे आठवडा बाजारही मोठा सोमवारी भरत असतो यामुळे नागरीकांचा जुनोनी गावाकडे ओढा जास्त असतो,
या मार्गावर दिवसभर जत आटपाडी जत कोळा अनेकएसटी ट्रक, टेम्पो, वडापचे टमटम, मोटारसायकली यांची दिवसभर ये जा सुरु असते संबधीत विभागाकडुन रोड कडे दुर्लक्ष केले जात आहे.
लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे बकरण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष नाही दिले तर आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


0 Comments