google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात मोठी बातमी.. राष्ट्रवादी काँग्रेस आणि या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढला! केंद्रीय निवडणूक आयोगाचा धक्कादायक निर्णय!

Breaking News

सर्वात मोठी बातमी.. राष्ट्रवादी काँग्रेस आणि या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढला! केंद्रीय निवडणूक आयोगाचा धक्कादायक निर्णय!

सर्वात मोठी बातमी.. राष्ट्रवादी काँग्रेस आणि या दोन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढला!

केंद्रीय निवडणूक आयोगाचा धक्कादायक निर्णय!

शिवसेनेच नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या पाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय ला मोठा धक्का दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस  तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

 केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मोठे पाऊल उचलले आहे.केंद्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असून राष्ट्रवादीचे नागालँड मध्ये आमदार देखील आहेत.

 तसेच लोकसभेत खासदार ही असून देखील या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय पक्ष असण्यासाठी नियमांनुसार  पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कमी झाल्यामुळे ही कार्यवाही आयोगाकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments