सांगोला रेल्वे थांब्यासाठी 10 हजार पोस्ट कार्ड पाठवण्याचे अभियान प्रारंभ
कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी रेल्वे थांब्यासाठी अशोक कामटे संघटनेचे अभियान
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
कलबुर्गी -कोल्हापूर -कलबुर्गी या रेल्वेस सांगोला येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा
या मागणीसाठी दहा हजार पोस्ट कार्ड पाठवण्याचा अभियान शुभारंभ स्टेशन रोड येथील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला. ही पत्रे रेल्वेमंत्री भारत सरकार ,रेल्वे राज्यमंत्री , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,महाव्यवस्थापक मुंबई यांना पाठवण्यात येणार आहे
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी सुमारे 5000 पोस्ट कार्डे पाठविण्याचा शुभारंभ करण्यात आला. सांगोला रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन हे शहर मिरज -कुर्डूवाडी लोहमार्गावरील महत्वाचे शहर आहे.
शहरातून अनेक मोठे राष्ट्रीय राज्य महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. या शहरात मोठी बाजारपेठ असल्याने तालुक्यातील व इतर जिल्ह्यातून परिसरातील नागरिक शहरात सतत ये -जा करीत असतात
त्यांच्या सोयीसाठी 22155 & 22156 कलबुर्गी- कोल्हापूर -कलबुर्गी येथे रेल्वे थांबा असणे आवश्यक आहे. याकरिता शहीद अशोक कामटे संघटनेने सहा महिन्यांपासून अनेक वेळा निवेदने, स्मरणपत्रे ,मोर्चा आंदोलन केलेले आहे
तरीही रेल्वे प्रशासनाने रेल्वेने अधिकृत थांबा मंजूर केलेला नाही. यावेळी या अभियानास शहरातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. तरी या अभियानात सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन या पत्र मोहिमेद्वारे
रेल्वे प्रशासनास जागृत करावे तरी नागरिकांनी स्टेशन रोड येथील संघटनेच्या कार्यालयात शिंदे मशिनरी स्टोअर्स, सांगोला येथून पोस्ट कार्ड प्राप्त करून आपला पाठिंबा दर्शवावा.
सदरचे अभियान यशस्वी करणेसाठी अशोक कामटे सामाजिक संघटनेचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट
कलबुर्गी- कोल्हापूर रेल्वे अधिकृत थांबा करिता शहीद कामटे संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे तरीपण रेल्वे प्रशासन मूग गिळून गप्प आहे अनेक शांततेच्या मार्गाने आंदोलन केली
अनेक वेळा रेल्वे खात्याकडून आश्वासने मिळाली या प्रश्नाबाबत दिल्ली येथील रेल्वे कार्यालयास जागा आणण्याकरिता
सदरचे दहा हजार पोस्ट कार्ड पाठवणचे अभियान अशोक कामटे संघटनेने सुरू केले आहे तरी सर्व नागरिक व प्रवाशांनी आपला सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवावा.
श्री .नीलकंठ शिंदे सर, संस्थापक :-शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला
0 Comments