काँग्रेस च्या "जय भारत सत्याग्रह सभेस" महूद बु येथे प्रचंड प्रतिसाद...
-तालुक्याचा आमदार काँग्रेस विचारांचाच होणार-तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे
राहुल गांधी यांची खासदारकी चुकीच्या पद्धतीने रद्द केल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महूद बु येथे जय भारत सत्याग्रह सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष मा. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहर घालून रॅली ची सुरवात झाली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की देशामध्ये लोकशाही संपविण्याचे काम मोदी सरकार करत आहे
राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रे मुळे सर्वासामान्य लोकांची चळवळ उभी राहत असून यामुळे देशात परिवर्तन होणार याची भीती वाटू लागल्याने नरेंद्र मोदी सरकार ने जाणीवपूर्वक मा.राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
परंतु देशातील महागाई आणी अत्याचाराने त्रस्त झालेली जनता देशात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असे मत जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
लवकरच तालुका दौरा करून तरुण कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून नवीन कार्यकारणी जाहीर करणार तसेच सांगोला तालुका हा काँग्रेस विचारांचा असून भविष्यात काँग्रेस विचारांचाच आमदार होणार असे मत नवनियुक्त तालुका अध्यक्ष ऍड. अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हात्तुरे,जिल्हा महिला उपाध्यक्ष मैना ताई बनसोडे,शहराध्यक्ष तोहीद मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे ,महिला तालुका अध्यक्ष सुमित्रा ताई लोहार,महात्मा फुले सूतगिरणी संचालक अभिजीत कांबळे,
मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष रणजित महापुरे,माजी ग्रामपंचायत सदस्य रेखा कांबळे, सिद्धेश्वर देशमुख,दादासो कांबळे,संतोष पवार,सुनील कांबळे, पुण्यवंत साठे, रोहित कारले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी मानले
0 Comments