ब्रेकिंग न्यूज.. खाजगी बसचालकांची RTO च्या झिरो कर्मचाऱ्यांकडून सांगोल्यात खुलेआम हप्ता वसुली !
सांगोला तालुका /प्रतिनिधी; सांगोला तालुक्यातून पुणे,मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, ईत्यादी ठिकाणी दररोज शेकडो खाजगी बस धावतात.
या खाजगी बस चालकांकडून सांगोल्यातील RTO चा झिरो कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हप्ते वसूल करून बस चालकांची आर्थिक पिळवणूक करत आहे.
राज्य सरकारने एस टी बसमध्ये महिलांना तिकीटावर ५०℅ सवलत दिल्याने अनेक महिला प्रवाशांनी या खाजगी बसकडे पाठ फिरवल्यामुळे आगोदरच मेटाकुटीला आलेल्या
खाजगी बस चालकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे. त्यात RTO च्या झिरो कर्मचाऱ्यांना द्याव्या लागणा-या मंथलीमुळे खाजगी बस चालक पुरते हैराण झाले आहेत.
बससाठी लागणा-या डिझेल, टायर,व इतर स्पेअर पार्टचे दिवसोंदिवस वाढत असणारे दर यामुळे बस चालवून कमाई करणे बस चालक,मालकांना जिकिरीचे झाले आहे.
त्यात RTO च्या तथाकथित झिरो कर्मचाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक यामुळे खाजगी बस सेवा धोक्यात आली आहे.
RTO च्या नावाने हप्ता वसूली करणाऱ्या झिरो एजंटावर कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments