धक्कादायक! मिरजेत सिव्हिल रुग्णालयातून
सांगोला तालुक्यातील महिलेचे ३ दिवसांच्या बाळाची चोरी, अज्ञात महिलेनं पळवलं
मिरज: सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना घडली.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील कविता समाधान आलदर यांची मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती.
त्यांना मुलगा झाला होता. आज (दि.३) सकाळी ११ वाजता कविता आलदर या बाळाला जवळ घेऊन रुग्णालयात झोपल्या होत्या.
यावेळी संशयित महिला त्याठिकाणी आली. तिने बाळाला डोस द्यायचे असल्याचे सांगून कविता आलदर यांच्यापासून बाळ घेऊन गेली.
परंतु तासभर झाला तरी संबंधित महिला बाळाला घेऊन न आल्यामुळे आलदर कुटुंबाने बाळाची शोधा शोध सुरू केली. यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली
असता एका संशयित महिलेने बाळाला रुग्णालयातून बाहेर घेऊन गेल्याचे चित्रीकरण झाले आहे. तसेच संबंधित महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात रेकी करत असल्याचे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा भेदून संबंधित महिलेने बाळ चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तसेच आक्रमक झालेल्या आलदर कुटुंबाने मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक आता बाळ चोरून नेलेल्या महिलेच्या मागावर रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments