शनिवार/रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी आधार
डॉक्युमेंट अपडेट व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट शिबीर राबविणे
आपणास सूचित करण्यात येते की, ज्या नागरिकांच्या आधार नोंदणीला 10 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे
अशा नागरिकांची आधार नोंदणी दस्तऐवज अद्ययावत करणे व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. सदरकामी मागील महिन्यांचा आढावा घेतला असता सोलापूर जिल्ह्यातील
सदर कामकाज अत्यंत कमी प्रमाणात झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत शासनाकडून आढावा घेतला जात असून आधार नोंदणी दस्तऐवज अद्ययावत करणे व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेशनच्या कामकाजाबाबत वारंवार विचारणा होत आहे.
तरी आपण उक्त विषयाच्या अनुषंगाने शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशीही तलाठी व ग्रामसेवक यांचे मदतीने गावोगावी फक्त आधार डॉक्युमेंट व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेशनचे कामकाज करणेकामी शिविरे राबविणेत यावे.
तसेच सदर आठवड्याच्या इतर दिवशी नेमून दिलेल्या ठिकाणी आधार डॉक्युमेंट व अनिवार्य वायोमेट्रिक अपडेशनचे कामकाज करावे.
शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी आयोजित केलेल्या शिबीरामध्ये केलेल्या कामकाजाचा व इतर दिवशी केलेल्या कामकाजाचा दैनंदिन अहवाल बिनचूक गूगल फॉर्म द्वारे भरावयाचा आहे.
सदर कामकाजामध्ये दुर्लक्ष / हयगय / निष्काळजीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांवर काळ्या यादीमध्ये टाकणेबाबतचा प्रस्ताव आधार प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांचेकडे सादर करणेत येईल याची नोंद घ्यावी.
0 Comments