google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मिरजेतील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ 'ते' बाळ अखेर सापडलं; तान्हुल्याचा चेहरा पाहून आईच्या डोळ्यांत पाणी

Breaking News

मिरजेतील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ 'ते' बाळ अखेर सापडलं; तान्हुल्याचा चेहरा पाहून आईच्या डोळ्यांत पाणी

मिरजेतील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ


'ते' बाळ अखेर सापडलं; तान्हुल्याचा चेहरा पाहून आईच्या डोळ्यांत पाणी

मिरजेतील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ काल रात्री सापडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्या महिलेला पोलिसांनी गजाआड करत सावळज येथे कारवाई केली आहे.

महिलेला पकडण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश आले असून, बाळ सुखरूप आहे. सारा सायबा साठे (वय २४, रा. डोंगरसोनी रस्ता, अल्ताफ गॅरेज पाठीमागे, सावळज, मूळ रा. इचलकरंजी) असे त्या महिलेचे नाव आहे. 

दरम्यान, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी ते बाळ स्वतः मातेकडे सुपूर्द केले. तान्हुल्याचा चेहरा पाहून तिच्या डोळ्यांत पाणी दाटले. तिला हुंदकाही फुटेना. डोळे भरून पाहिले अन् ती भेदरून गेली.

अधिक माहिती अशी की, कोळे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. 

सहा दिवसांपूर्वी त्यांना मुलगा झाला. आलदर यांना प्रसूतीनंतर उपचारासाठी रुग्णालयातील वॉर्डात ठेवले होते.

 तीन दिवसांपूर्वी संशयित साठे या महिलेने बाळाला डोस द्यायच्या बहाण्याने पळवून नेले. रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा भेदून महिला बाळाला घेऊन पळून गेल्याने खळबळ उडाली. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे निपाणीतील एका महिलेवर संशय आला. पण, पथकाच्या पदरी निराशाच आली. दरम्यान, 

महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुनील गिड्डे यांनी तपासाला उलटी दिशा दिली. त्यातून सावळज येथे ती महिला असल्याची पक्की माहिती रात्री समोर आली.

 तातडीने पथक त्या महिलेच्या घरी दाखल झाले. तिच्याजवळ बाळ सुखरूप असल्याची खात्री केली. त्यानंतर त्या महिलेस आणि बाळास मिरजेतील शासकीय रुग्णालयात आणले. 

अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी ते बाळ त्या माऊलीच्या ताब्यात दिले. त्यानंतर माऊली ढसाढसा रडू लगली. दरम्यान, यापूर्वीच पोलिसांनी वैद्यकीय पथकामार्फत बाळाची तपासणी केली ते बाळ सुखरूप असल्याचे समोर आले.

कारवाईत अपर अधीक्षक रितू खोखर, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी पोलिस चौकीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुनील गिड्डे, उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, 

संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, अभिजित पाटील, मोहसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रणजित घोडके, सायबरच्या रूपाली बोबडे, अफरोज पठाण, सतीश आलदर, कॅप्टन गुंडवाडे यांच्यासह पथकाचा समावेश होता.

आजोबांनी धरले पोलिसांचे पाय

बाळाची आजी लक्ष्मी यांनी रितू खोखर यांच्या गालावरून हात ठेवत माझ्या लेकराला कसं आणलं, असे विचारत कौतुक केले. खोखर या भारावून गेल्या. आजोबांनी तर पोलिसांचे पाय धरले. हे सगळं सुरू असताना अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Post a Comment

0 Comments