google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बारावीच्या परीक्षेत हिंदी विषयात बोर्डात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ऋतुजा चव्हाण हिचा जय मल्हार क्रांती संघटनेकडून सत्कार !

Breaking News

बारावीच्या परीक्षेत हिंदी विषयात बोर्डात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ऋतुजा चव्हाण हिचा जय मल्हार क्रांती संघटनेकडून सत्कार !

बारावीच्या परीक्षेत हिंदी विषयात बोर्डात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल


ऋतुजा चव्हाण हिचा जय मल्हार क्रांती संघटनेकडून सत्कार !

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी ; बारावीच्या बोर्ड परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची कला शाखेची विद्यार्थिनी कुमारी चव्हाण ऋतुजा संतोष हिने हिंदी विषयात १०० पैकी ९८ गुण मिळवत बोर्डात प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळवला आहे.

त्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दौलत नाना शितोळे साहेब व  महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री अंकुशराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली

 नाझरा ता. सांगोला येथील रामोशी समाजाची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा संतोष चव्हाण हिने  बोर्डात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सांगोला तालुका जय मल्हार संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. 

यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सचिव- माननीय श्री. उमेश(भाऊ)मंडले, महाराष्ट्र राज्य 

शिक्षण समिती अध्यक्ष - श्री मधुकर चव्हाण, सोलापूर जिल्हा शिक्षण समिती अध्यक्ष -श्री अशोक मंडले सर , सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख - सचिन मंडले, 

सांगोला तालुका जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष - श्री समाधान मंडले, विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे विषय शिक्षक श्री विभुते सर तसेच बनसोडे सर व चव्हाण परिवारातील समाज बांधव उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments