ब्रेकिंग न्यूज ! 'जलजीवन' कोळी-कमळेंवर कारवाई प्रस्तावित ; कमळें सक्तीच्या रजेवर? ; सांगोल्याचे बाबा कारंडे समाधानी
सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जलजीवन मिशनच्या अनियमिततेवर मोठी अपडेट समोर आली आहे.
सांगोल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.
सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कारवाईवर ते समाधान दिसून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगोला प्रकरणात शासनाकडे कारवाई प्रस्तावित केली असल्याचे समजले.
अधिक माहिती देताना कारंडे म्हणाले, आज सीईओ स्वामींसोबत बैठक झाली, त्यांनी सांगोल्याच्या 8 गावात झालेला घोटाळा प्रकरणी प्रशासनाने तयार केलेला अहवाल
मी वाचला, मी समाधानी आहे. या प्रकरणात प्रमुख दोषी असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना खुलासा
देण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली असून, कोळी यांच्यासह उप अभियंता कमळे याच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे तर कमळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे.
8 गावांमध्ये चुकीचे इस्टीमेट झाले असेल ते बदलावे आणि काही वस्त्या राहिल्या असतील तर त्या घेतल्या जाव्यात अशा सूचना करण्यात आल्या असल्याचे कारंडे यांनी सांगितले.


0 Comments