ब्रेकींग न्युज ! सोलापुरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली ; वादळी वाऱ्यासह
पडलेल्या पावसाने शहरात मोठे नुकसान ; पावसाचे रौद्ररूप पहा या फोटो आणि व्हिडिओमधून
सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.
@सोलापूर_शहराला मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण केले होते. दिवसभर कडक ऊन सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग जमा होऊन वारा सुटायचा मात्र पाऊस काही आला नाही.
शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, दुपारी साडेचारच्या सुमारास मात्र आकाशात ढग दाटून आले, वादळी वारा सुरू झाला, विजेच्या कडकडाट सुरु झाला
आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्हाळून पडली आहेत.
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कामात हॉटेल जवळ एका कारवर झाड पडल्याने त्या कारचे नुकसान झाले.
वाडिया हॉस्पिटल जवळ एक मोठे झाड विजेच्या तारांवर पडल्याने खांब सुद्धा वाकला आहे आणि रस्त्यावर तारा पडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने तात्काळ त्याठिकाणी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या दक्षिण सोलापूर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर झाड पडले आहे.
शहरात ठिकठिकाणी उंच झाडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहनचालकांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
जाता येताना त्रास सहन करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाऊण तास पावसाने हजेरी लावली अजूनही ढगाळ वातावरण असून रात्रीच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता वातावरणावरून दिसत आहे.
0 Comments