google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुष्पलता मिसाळ यांच्या काव्यपुष्पांजली या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

Breaking News

पुष्पलता मिसाळ यांच्या काव्यपुष्पांजली या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

पुष्पलता मिसाळ यांच्या  काव्यपुष्पांजली या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

 कवयित्री सौ पुष्पलता मिसाळ यांच्या काव्यपुष्पांजली या काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले विद्यापीठ


 पुणे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन व समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य मांतग साहित्य परिषद, पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङ्:मय पुरस्कार-2023 चे वितरण 

 मंगळवार, दि.-११/४/२०२३ रोजी संत ज्ञानेश्‍वर सभागृह, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील शाही हाॅल मध्ये  दिमाखदार सोहळ्यात मा.पद्श्री दादा इदाते यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी मा.प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे होते यावेळी  पुणे विद्यापीठाचे  कुलगुरू मा.डाॅ.कारभारी काळे ,  मा.पद्श्री रमेश पतंगे  मा.आमदार सुनील कांबळे पुणे, मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र, 

पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, समरसता साहित्य परिषदेचे समन्वयक डॉ. अंबादास सगट, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील व अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भडंगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते

  सदर कार्यक्रमास अनेक जेष्ठ लेखक, कवी , साहित्यिक आणि रसिक श्रोते गणाची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments