google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मूक बधिर निवासी शाळा सांगोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही : तहसीलदारांनी कारवाई करावी: खंडू ( तात्या) सातपुते अन्यथा समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार!

Breaking News

मूक बधिर निवासी शाळा सांगोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही : तहसीलदारांनी कारवाई करावी: खंडू ( तात्या) सातपुते अन्यथा समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार!

 मूक बधिर निवासी शाळा सांगोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही :

तहसीलदारांनी कारवाई करावी: खंडू ( तात्या) सातपुते अन्यथा समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार!

सांगोला/ प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

 मूक बधिर निवासी शाळा, सांगोला या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही.

वरील विषयास अनुसरून मी श्री. वसंत बाबासाहेब पाटील विशेष शिक्षक जनजागृती प्रबोधन मंच चोपडी (सं) मूक बधिर निवासी शाळा सांगोला.या मुक बधिर निवासी शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सकाळी ७:४० पासून उपस्थित होते. 

जयंती साजरी करण्यासाठी सर्व कर्मचारी ८:०० वाजता हजर झाले होते परंतू मुख्याध्यापिका हजर झाल्या नाहीत. मुख्याध्यापिका यांचेकडून जयंती साजरी करण्यात येणार नाही

 हा निरोप मिळाल्याने हळूहळू करून आलेले सर्व कर्मचारी ९:०० वाजेपर्यंत निघून गेले. महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शाळेवर अजून हजर होते.

 मुख्याध्यापिका या गेली १९ वर्षापासून शालेय कामकाजासाठी शाळेत हजर रहात नाहीत, त्या घरी बसून शालेय कामकाज करत आहेत. वारंवार महापुरुषांचा अपमान करणे, राष्ट्रीय सण, उत्सव साजरे न करणे याप्रकारे त्या कार्य करत आहेत. 

मी मुख्याध्यापिका शाळेत हजर रहात नाहीत म्हणून लेखी व तोंडी तक्रारी वारंवार समाज कल्याण अधिकारी व वरिष्ठ कार्यालयास दिल्या आहे. परंतु यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.असे तेथील शिक्षकांनी सांगितले.

14 एप्रिल घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करणे ही खूप मोठी वेदना देणारी घटना मुख्याध्यापिका यांनी केली आहे. जयंती साजरी न करणे हा ठरवून केलेला अपमान आहे.

 या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुख्याध्यापिका यांचेवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा सांगोला तालुक्यामध्ये या समाजकंटक मुख्याध्यापकाविरुद्ध आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल यामध्ये काय झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचे असेल लवकरात

 लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करून यांना निलंबित करावे अशी मागणी आरपीआयची तालुकाध्यक्ष सातपुते यांच्याकडून करण्यात आली आहे.

तशा आशियाची निवेदन पुढील प्रमाणे देण्यात आली आहेत.मा. सचिव साहेब, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई मा. आयुक्त साहेब, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय,

 सोलापूर. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर.मा. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे.मा. समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जि.प.सोलापूर मा. अध्यक्ष, जनजागृती प्रबोधन मंच, चोपडी.

Post a Comment

0 Comments