ब्रेकिंग न्यूज.. लाचखोर तलाठी सुरज नळे अखेर निलंबीत;
कोरे चेक प्रकरणी 'मुख्य सूत्रधार' व बँक अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार?
सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या शेतजमिनीची मंजूर रक्कम देण्याकामी सात हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणातील आरोपी तथा
तलाठी सुरज रंगनाथ नळे याला महसूल प्रशासनाने वृत्तपत्रातील बातम्याच्या दणक्यानंतर अखेर निलंबीत केल्याचा आदेश काढला असून हा आदेश मंगळवेढा महसूल विभागास प्राप्त झाला आहे.
दरम्यान कोरे चेक प्रकरणी अँटीकरप्शन कार्यालयात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधार व संबंधित बँक अधिकारी अडचणीत येणार आहे.
यातील आरोपी सुरज नळे हे प्रत्यक्षात अरळी सजेत तलाठी पदावर कार्यरत होते, मात्र त्यांना उपविभागीय कार्यालयात ठेवण्यात आले होते.
सोलापूर-मंगळवेढा महामार्गातील बाधीत पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्याकामी सात हजाराची लाच स्विकारली होती.
या प्रकरणी दि.1 एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7.7 अ 12 भादंवि कलम 08, 353, 336, 337, 279, 204 सह
मो.वा.कायदा कलम 184 प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नळे यास अटक केली होती. याचा अहवाल तपास अधिकारी महाडीक यांनी जिल्हा महसूल प्रशासनास सादर केला होता.
दरम्यान आरोपी तब्बल 17 दिवस जेल मध्ये बसूनही मसहूल प्रशासनाने त्यास निलंबीत न केल्याने महसूल प्रशासनाचा आंधळा कारभार या मथळ्याखाली वृत्त छापल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले व त्यांनी निलंबनाचा तात्काळ आदेश काढला आहे.
या आदेशात महाराष्ट्र नागरिक सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 (1) (क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा आधारे नियम 4 (2) (अ) मधील तरतूदीनुसार 48 तासाहून अधिक काळ पोलीस कोठडीत ठेवले असल्याने
दि.1 एप्रिल पासून नळे यास सेवेतून निलंबीत करीत असल्याचे आदेशात नमूद करुन नळे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय सांगोला राहील.
तहसिलदार सांगोला यांचे पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये,निलंबन कालावधीत खाजगी नोकरी किंवा धंदा स्विकारु नये, तसे केल्यास दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.
0 Comments