धक्कादायक ! महिलेचे हातपाय बांधून लुटला 63 लाखांचा ऐवज
या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथकांची निर्मिती करण्यात आली असून पोलीस विविध प्रकारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
बारामती शहरातील देवकाते नगर परिसरात देवकाते पार्क येथील एका घरात घुसून चोरट्यांनी चक्क महिलेचे हातपाय बांधून 63 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
रात्री सव्वा आठच्या दरम्यान ही घटना घडली असल्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घरात घुसून महिलेचे हात पाय बांधून चोरी करणे ही घटना गंभीर स्वरूपाची मानली जात असून याप्रकरणी पोलिस आता कोणता तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
चार अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी तृप्ती सागर गोफणे यांनी फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली 55 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास 63 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला.
0 Comments