google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात महुद येथे शेततळ्यात पाय घसरून शेतकऱ्याचा पडल्याने ५७ वर्षीय पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यात महुद येथे शेततळ्यात पाय घसरून शेतकऱ्याचा पडल्याने ५७ वर्षीय पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

सांगोला तालुक्यात महुद येथे शेततळ्यात पाय घसरून

शेतकऱ्याचा पडल्याने ५७ वर्षीय पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथील येताळ बनात घडली.

 किरण शिवाजी नागणे (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव होय. याबाबत विशाल संभाजी नागणे (रा. महूद) याने पोलिसांत खबर दिली आहे.

मृत किरण नागणे हे घरातून मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारासशेळ्यांना चारा आणण्यासाठी त्यांच्या येताळ- बणातील शेतात गेले होते.

 त्याठिकाणी दिलीप चव्हाण यांच्या शेततळ्यालगत झाडाचा पाला काढत असताना पाय घसरून शेततळ्यात पडून पाण्यात बुडाले.

 दरम्यान, चारा आणण्यासाठी शेतात गेलेले वडील सायंकाळी ६ वाजले तरी अजून घरी का परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा आकाश शेतात गेला. त्यावेळी त्यास वडिलांच्या चपला शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. 

त्याने बॅटरीच्या उजेडात शेततळ्यात पाहिले असता वडील पाण्यात बुडल्याचे दिसून येताच त्याने आरडाओरड करून घटनेची माहिती घरी दिली.

Post a Comment

0 Comments