मोठी बातमी! महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार?
एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी बंड केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले.
दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मे महिन्यात सत्ता संघर्षाचा निकाल अपेक्षित आहे. त्यातच राज्यात पुन्हा नव्या घडामोडी होत आहेत.
आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का, असेही प्रश्न निर्माण होत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बदलत्या भूमिकेमुळे हा संशय बळावला आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भगतसिंह कोशारी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झाली होती.
मात्र आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार आहेत. कारण बैस यांना लवकरच कार्यमुक्त केले जाणार आहे. याबाबत भाजपमध्ये तशा हालचाली सुरू झाले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी पुन्हा धक्कादायक संकेत मिळत आहेत.
0 Comments