अशोक कामटे संघटनेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या तोरणा मुख्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू महेश कम्प्युटरचे संचालक नवनाथ शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका ग्राहक पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली
व डॉ. आंबेडकरांच्या शिका ,संघटित व्हा व संघर्ष करा या त्रिसूत्री मूल्याचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर यांनी केले.
यावेळी हर्षवर्धन चव्हाण ,अमोल शिंगारे विठ्ठलपंत शिंदे सर, शहाजी पाटील यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले वाहून अभिवादन केले.
0 Comments