अपात्र ठरलेल्या राहुल गांधीच्या मदतीला ही महिला धावली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे.
लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. पण आता राहुल गांधी बंगला सोडल्यानंतर कुठे राहणार या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे.
मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीमुळे राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. पण त्यानंतर लगेच त्यांना खासदार बंगला शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तशी नोटीसही त्यांना पाठवली आहे.अपात्र ठरलेल्या सदस्याला त्याचे सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून एका महिन्याच्या आत त्याला मिळालेला सरकारी बंगला रिकामा करावा लागतो.
पण आता दिल्ली काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्या राजकुमारी गुप्ता यांनी त्यांचं चार मजल्याचं घर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेसने ‘मेरा घर, राहुल गांधी का घर’, असा प्रचार सुरु केला आहे. भोपाळमध्ये काँग्रेस नेत्यांनी घराबाहेरील नावाच्या पाट्या बदलण्यास सुरूवात केली. त्यावर ‘माझे घर राहुलचे घर’ असे लिहिले आहे.
प्रचाराचा एक भाग म्हणून काँग्रेस नेते आपल्या घरावर ‘मेरा घर राहुल गांधी का घर’ चे बॅनर पोस्टर लावत आहेत. इतकंच नव्हे तर ते राहुल गांधींना राहण्यासाठी घरही देऊ करत आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते.
वायनाड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे सदस्यत्व नुकतेच रद्द झाले. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होईल
अशी चर्चा होती, मात्र निवडणूक आयोगाने तूर्तास याठिकाणी पोटनिवडणूक होणार नसल्याचे जाहीर केल्याने राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.
0 Comments