google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर एकतर्फी प्रेमातून दिली धमकी; नववीतील मुलीची आत्महत्या; ४ जणांविरोधात गुन्हा

Breaking News

पंढरपूर एकतर्फी प्रेमातून दिली धमकी; नववीतील मुलीची आत्महत्या; ४ जणांविरोधात गुन्हा

पंढरपूर एकतर्फी प्रेमातून दिली धमकी; नववीतील मुलीची आत्महत्या; ४ जणांविरोधात गुन्हा

एकतर्फी प्रेमातून मुलाने धमकी दिल्याने व इतर तीन अल्पवयीन मुलींनी चिडवल्याने नववीतील मुलीने आत्महत्या केल्याच्या कारणावरून 

एका युवकासह इतर तीन मुलींच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली नामदेव बंकवाड (वय १६, रा. अनिल नगर, पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली हिने २५ मार्च रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगलल ओढणीने गळफास घेतला होता.

पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर उघड झाले की, वैजीनाथ सुनील पवार (वय १९) याने एकतर्फी प्रेमातून रुपालीला धमकी दिली होती. तसेच तिच्या मैत्रिणीदेखील रूपालीस वैजीनाथच्या नावाने चिडवत होत्या.

तसेच वैजीनाथसोबत प्रेम करण्याचा आग्रह धरल्याने रूपालीने आत्महत्या केली. तपास अधिकारी प्रशांत भागवत यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे.

Post a Comment

0 Comments