google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील चिंचोली व वाढेगाव येथील पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून ५कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील .

Breaking News

सांगोला तालुक्यातील चिंचोली व वाढेगाव येथील पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून ५कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील .

 

सांगोला तालुक्यातील चिंचोली व वाढेगाव येथील पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी

पर्यटन विभागाकडून ५कोटी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील .

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

 सांगोला प्रतिनिधी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडून  प्रादेशिक 

पर्यटन विकास योजनेअंतर्गत  सांगोला तालुक्यातील मोजे वाढेगाव येथील त्रिवेणी संगम पर्यटन स्थळ विकसित करून सुशोभिकरण करणे  बांधकाम करण्याच्या कामास 

२कोटी५०लाख  व मोजे चिंचोली येथील तलाव पर्यटन विकसित करून सुशोभिकरण  करणे तसेच बांधकाम करणे या कामासाठी २कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार शहाजीबापू  पाटील यांनी दिली

 सांगोला शहराच्या लगत असणाऱ्या दोन्ही गावातील  कामांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याने  सांगोला शहराच्या व सांगोला तालुक्याच्या वैभवामध्ये अधिकची भर पडणार आहे  

दोन्ही ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात असल्याने  या ठिकाणी शुशोभिकरणाची  कामे झाल्यास   पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे  त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार आहे .

Post a Comment

0 Comments