google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी सावधान करोना हातपाय पसरवतोय; सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या पुढे बाधितांची नोंद

Breaking News

मोठी बातमी सावधान करोना हातपाय पसरवतोय; सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या पुढे बाधितांची नोंद

मोठी बातमी सावधान करोना हातपाय पसरवतोय;

सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या पुढे बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा करोनाने आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, गुरुवारी देशात नव्या 3,095 करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यालायाने मिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 

यामध्ये गोवा-गुजरातमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5.30 लाख लोकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात करोनाचे एकूण 4.47 कोटी रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात तीन हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जे गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच घडले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोना संसर्ग होत होता.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात करोनाच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी करोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते. 

याशिवाय 1,396 रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 इतकी होती, जी आता 15,208 वर पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments