धक्कादायक;आधार कार्डमुळे,”शिक्षकांची लागली वाट…
जवळपास 13,000 अतिरिक्त शिक्षक” लवकरच घरी जाणार
आता डिझिटल इंडियात आता आधार कार्डमुळे,विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत किमान १३ हजार शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
आधार नोंदणी व यूआयडीएआयकडून वैध करून घेण्याची मुदत आज(रविवारी) संपत आहे. त्यामुळे राज्यात शिक्षण विभागात -शिक्षकात अस्वस्थता निर्माण झाली आहे
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी,
तसेच समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालयामार्फत चालवल्या जात असलेल्या शाळांमधून सुमारे दोन कोटी १३ लाख ८५ हजार ५४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी स्टुडंट पोर्टलवर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांची नोंदविलेली आधार माहिती यूआयडीएआयकडून वैध ठरेल.
अस वारंवार सांगितलं जातं आहे याची मुदत आज संपत आहे. पण अंतिम धमाका टाळण्यासाठी यानुसार अतिरिक्त शिक्षक-बेरोजगार होणार,याला मुदतवाढ मिळू शकते..
यानुसार,विद्यार्थ्यांची नोंदविलेली आधार माहिती-तेवढेच विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
तेवढ्याच विद्यार्थी संख्येवर शिक्षक संच मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून ३० एप्रिलची मुदत देण्यात आली होती, तरीही सुमारे चार लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती अद्याप नोंदवली गेली नाही.
त्यामुळे शासन धोरणानुसार किमान ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी आकडेमोड केल्यास किमान १३ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान अनेक तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील विद्यार्थी आधार नोंदणीचे काम पूर्ण झालेले नाही. शिक्षण विभागाने त्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
– दिलीप आवारे, अध्यक्ष, डीएड पदवीधर, कला, क्रीडा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.असं संघटना यांच्यामार्फत , मुदतवाढ हाच तोपर्यंत पर्याय या शिक्षक यांच्यासमोर आहे अस दिसत आहे.
अशी आहे स्थिती २,१३,८५,५४९ – शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी ३,९२,३१५ – आधार माहिती नोंदवली नसलेले
१,८९,२६,६६३ – आधार कार्डची माहिती पडताळणीसाठी यूआयडीएआयकडे पाठविलेली विद्यार्थी संख्या २७,२०,२४४ – यूआयडीएआय कडून अवैध ठरलेली आधार माहिती
दरम्यान, शिक्षण संचालकांपासून ते शिक्षणाधिकारी व छोट्या छोट्या संस्था चालकांनीही वारंवार आधार माहिती अपडेट करण्यासाठी पाठपुरावा केला.
मात्र, माहिती भरताना वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी, बंद पडणारी वेबसाइट, अनेक शाळांकडे उपलब्ध असणाऱ्या तोकड्या सोयीसुविधा, नेटवर्कची समस्या आदी अनेक कारणांनी अद्याप लाखो मुलांचे आधार नोंदविता आले नाहीत.
अनेक विद्यार्थी पालकांबरोबर स्थलांतरित झाले आहेत. त्यांची आधार उपलब्ध नाहीत. या डिझिटल जागरण- गोंधळात शिक्षक अतिरिक्त होणार यामुळे लाभार्थी शिक्षक यांच्यात अस्वस्थता आहे.


0 Comments