google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोशतीन दिवसांवर तिचं लग्न होतं,

Breaking News

हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोशतीन दिवसांवर तिचं लग्न होतं,

 हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोशतीन दिवसांवर तिचं लग्न होतं,

 पत्रिकाही वाटून झाल्या होत्या, बस्ता बांधून तयार होता, घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच मुलीसोबत धक्कादायक घटना घडली. 

संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अंघोळीला गेलेल्या 18 वर्षांच्या भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

लग्नघरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची तिरडी उचलावी लागल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात वांगी खुर्द गावात हा प्रकार घडला आहे. 

या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरली असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव, असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.

26 मार्चला पल्लवीचं लग्न होतं, त्यामुळे ती आनंदी होती. लग्नाआधी शुक्रवारी तिची हळद होती, त्यामुळे आवरून लवकर तयार होण्यासाठी ती अंघोळीला बाथरूममध्ये गेली, 

पण गरम पाणी घेत असतानाच तिला हिटरचा शॉक बसला, यामध्ये पल्लवीला जीव गमवावा लागला आहे. हिटरमुळे मृत्यू होण्याच्या घटना मागच्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत, त्यामुळे हिटरच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment

0 Comments